हिवरे, देवसुवाडा येथे झोपडी व काजू बागायतीला आग; ३ लाखांचे नुकसान

२ लाख रुपयांची मालमत्ता अग्न‌िशामक दलाने वाचवली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20 mins ago
हिवरे, देवसुवाडा येथे झोपडी व काजू बागायतीला आग; ३ लाखांचे नुकसान

वाळपई (Valpoi) : गोव्यातील (Goa) हिवरे, देवसुवाडा  येथील झोपडी व काजू बागायतीला (Cashew Plantation) आग (Fire) लागली. त्यात सुमारे ३ लाख रुपयांची हानी झाली. २ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात वाळपई अग्न‌िशामक दलाला यश आले. 

या आगीत महादेव गावकर यांची झोपडी जळाली तर आगीत काजू बागायतीचेही नुकसान झाले. तुकाराम गावकर व अप्पा गावकर यांच्या काजू बागायतीची हानी झाली. 

आग लागल्याची माहिती मिळताच वाळपई अग्न‌िशामक दलाने धाव घेतली. डोंगरावरील झोपडीला व काजू बागायतीत लागलेली आग विझवण्यासाठी वाळपई अग्न‌िशामक दलाला बरीच धावपळ करावी लागली. अग्न‌िशामक दलाने वेळीच आग विझवल्याने मोठी हानी टळली. 

हेही वाचा