अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पुत्र मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्सने टाकला होता 'अॅसेम्बली ऑफ एक्सपर्ट्स'च्या सदस्यांवर मोठा दबाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पुत्र मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर

तेहरान/वॉशिंग्टन:मध्यपूर्वेतील युद्धसदृश परिस्थितीने आतापर्यंतचे सर्वात भीषण वळण घेतले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यांच्या जागी त्यांचे दुसरे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या ३७ वर्षांपासून इराणची सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या खामेनेई युगाचा असा अनपेक्षित अंत झाल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इराणच्या ८८ सदस्यीय 'अॅसेम्बली ऑफ एक्सपर्ट्स'ने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले असून, इराणच्या क्रांतीकारी रक्षक दलाने (IRGC) यासाठी मोठा दबाव टाकल्याचे समजते.



हवाई हल्ल्यात खामेनेईंचा अंत आणि अमेरिकेची भूमिका

गेल्या शनिवारी अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई दलाने मध्य तेहरानमधील खामेनी यांच्या मुख्य निवासस्थानावर भीषण बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह इराणचे सुमारे ४० उच्चपदस्थ अधिकारी मारले गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची पुष्टी करताना सांगितले की, इराणकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता असल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या नौदल आणि हवाई तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये सत्तापालटाचे वारे वाहू लागले असून, सुरुवातीला मोजतबा खामेनेई हे देखील या हल्ल्यात मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ते सुदैवाने बचावले असून आता त्यांच्याकडे देशाची सर्वोच्च सूत्रे सोपवण्यात आली आहेत.


Mojtaba Khamenei's Election to Supreme Leadership Is Not the End - Middle  East Forum


कोण आहेत मोजतबा खामेनेई ?

१९६९ मध्ये मशहाद येथे जन्मलेले मोजतबा हे अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण तेहरानमधील 'अलवी' हायस्कूलमध्ये झाले असून त्यांनी कोम येथील धार्मिक केंद्रात उच्च शिक्षण घेतले आहे. मोजतबा यांनी इराण-इराक युद्धादरम्यान 'हबीब बटालियन'मध्ये सेवा बजावली होती, जिथे त्यांचे इराणच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील बड्या नेत्यांशी जवळचे संबंध निर्माण झाले. जरी त्यांच्याकडे अधिकृतरीत्या कोणतेही सरकारी पद नव्हते, तरीही ते आपल्या वडिलांच्या कार्यालयाचे मुख्य सूत्रधार मानले जात होते. अमेरिकेने २०१९ मध्ये त्यांच्यावर निर्बंध लादले होते. त्यांच्यावर असा आरोप होता की, अली खामेनी यांनी आपले अनेक अधिकार मोजतबा यांना दिले होते आणि ते पडद्यामागून देशाचा कारभार चालवत होते.


Mojtaba Khamenei: Iran crisis: Ayatollah's son Mojtaba Khamenei emerges as  front-runner to succeed slain Supreme Leader - report - The Times of India

 

वारसाहक्कावरून वाद आणि संविधानातील पेच

इराणच्या इस्लामिक क्रांतीचा पायाच 'वंशपरंपरागत राजवट' नाकारण्यावर आधारलेला आहे. त्यामुळे मोजतबा यांची निवड हा इराणच्या मूळ विचारधारेला धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, मोजतबा यांच्याकडे 'अयातुल्ला' ही धार्मिक पदवी नाही, जी सर्वोच्च नेत्यासाठी घटनात्मकदृष्ट्या आवश्यक असते. त्यांच्या धार्मिक पात्रतेवरून इराणच्या वरिष्ठ धर्मगुरूंमध्ये मतभेद आहेत. यापूर्वी अली खामेनेई यांनी उत्तराधिकारी म्हणून तीन ज्येष्ठ धर्मगुरूंची नावे सुचवली होती, ज्यात मोजतबा यांचे नाव नव्हते. मात्र, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) मोजतबा यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केल्याने त्यांची निवड सुकर झाली आहे.


Could Iran's Leadership Really Become Hereditary?


युद्धाचा भडका आणि जागतिक चिंता

खामेनेईच्या मृत्यूनंतर इराणनेही प्रतिहल्ला सुरू केला आहे. सौदी अरेबिया आणि कुवेत येथील अमेरिकन दूतावासांवर इराणी ड्रोन्सनी हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने सौदी, कुवेत आणि लेबनॉनमधील आपले दूतावास बंद केले असून सरकारी कर्मचाऱ्यांना मध्यपूर्वेतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळही धुराचे लोट पाहण्यात आले. इराणमधील मृतांचा आकडा ७८७ वर पोहोचला असून, यात एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६५ मुलींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे ऑपरेशन आणखी चार ते पाच आठवडे सुरू राहण्याचे संकेत दिले असून, इराणमध्ये नवा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर त्यांनी आम्ही ज्यांच्याबद्दल विचार केला होता, ते सर्व आता मृत आहेत, असे धक्कादायक विधान केले आहे.

Ebrahim Raisi's helicopter crash death clears field for Khamenei's son in  Iran

एकूणच मोजतबा खामेनेई यांची निवड इराणला एका नव्या दिशेला नेणार की देशांतर्गत यादवीला आमंत्रण देणार, हे येणारा काळच ठरवेल. खामेनेई यांच्या जाण्याने इराणमधील लोकशाहीवादी आणि सरकारविरोधी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी नव्या सर्वोच्च नेत्यासमोर देश वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा