
पणजी : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) पाटगांवचे माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर (५२ वर्षे) हे बेपत्ता आहेत. ते गोव्यात (Goa) आल्याची शक्यता कुटुंबियांनी वर्तवली आहे.
७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता बाहेर जेवायला जातो असे सांगून घरातून निघाले ते अद्याप घरी परतलेले नाहीत.
सध्या गारगोटी पोलीस (Police), गुन्हे शाखा पोलीस आणि गावचे रहिवासी त्यांचा कसून शोध घेत आहेत. दोन महिने होत आले तरी त्यांचा शोध न लागल्याने कुटुंबियांमध्ये आणि गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
कुणाच्या निदर्शनास आल्यास गारगोटी पोलीस किंवा त्यांचे बंधू संजय पिळणकर यांना ९४२०३५२२४७ व मुलगा पारस पिळणकर यांना ७८२२९६१५१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. महेश पिळणकर यांना शोधण्यास सहकार्य केलेल्या व्यक्तीस योग्य ते बक्षिस देण्यात येणार असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.