यावर्षी पीएफवर ८.२५ टक्के व्याजदर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
यावर्षी पीएफवर ८.२५ टक्के व्याजदर

नवी दिल्ली : २०२५-२६ या आर्थ‌िक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) (EPFO)  पीएफ (PF)  खात्यावरील व्याजदर ८.२५ टक्के एवढा निश्च‌ित केला आहे. ईपीएफओचे व्याजदर सलग दुसऱ्या वर्षी स्थिर राहिले आहेत.

ईपीएफओने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला होता. २०२४ मध्ये ईपीएफओने व्याजदरात किरकोळ वाढ करून २०२३-२४ साठी ८.२५ टक्के केला होता. २०२२-२३ मध्ये हा व्याजदर ८.१५ टक्के होता. ईपीएफओने मार्च २०२२ मध्ये त्यांच्या सदस्यांसाठी निवृत्तीनंतरच्या ठेवींवरील व्याजदर २०२१-२२ साठी ८.१० टक्के केला होता.

चार दशकांतील जो निचांकी पातळीवर होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली व त्यांनी पीएफ व्याजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर २०२५-२६ साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

सरकारच्या मंजुरीनंतर २०२५-२६ साठीचे व्याज कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. अर्थ मंत्रालयामार्फत सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ व्याजदर प्रदान करते. 


हेही वाचा