
नवी दिल्ली : इराणमधील (Iran) वाढत्या संघर्षाचा हादरा जागतिक बाजारपेठेला बसू लागला आहे. भारतीय (India) रुपया सोमवारी महिन्याभरातील सर्वात खालच्या पातळीवर घसरला, तर प्रमुख समभाग निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली.
सोमवारी रुपया डॉलरच्या (Dollar) तुलनेत ०.३ टक्क्यांनी घसरून ९१.२३५० वर बंद झाला. फेब्रुवारी सुरू झाल्यापासून ही सर्वात नीचांकी पातळी आहे.
त्याच वेळी निफ्टी ५० आणि सेन्सेक्सनेही आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर घसरणीसह व्यवहाराला सुरूवात केली.
तेलदरवाढीचा परिणाम
अमेरिका आणि इस्त्रायलने शनिवारी इराणवर हल्ले केल्यानंतर संघर्ष अधिक पेटला. इराणने त्याला प्रत्युत्तर दिल्याने व्यापक प्रादेशिक युद्धाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूदारांनी सुरक्षित पर्यायांकडे मोर्चा वळवला आणि उदयोन्मुख बाजारातील चलन व समभाग विक्रीचा दबाव वाढला. ब्रेंट क्रूड तेलच्या दरात जवळपास ६ टक्क्यांची उसळी नोंदवली गेली. दर तात्पुरते प्रति बॅरल ८२ डॉलर पर्यंत पोहोचले. इतर आशियाई चलनांमध्येही ०.२ ते ०.६ टक्क्यांची घसरण झाली.