श्रीनगरच्या लाल चौकात निदर्शने आणि अमेरिका-इस्रायलविरोधी घोषणाबाजी

पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान हाय अलर्टवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
श्रीनगरच्या लाल चौकात निदर्शने आणि अमेरिका-इस्रायलविरोधी घोषणाबाजी

श्रीनगर : इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येताच, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवारी सकाळपासूनच श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात हजारो नागरिकांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. 'रहबर तेरे खून से इंकलाब आएगा' अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.



इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी सकाळी खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. यानंतर, काश्मीरमधील शिया बहुल भागांतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. लाल चौकात जमा झालेल्या आंदोलकांच्या हातात खामेनी यांची छायाचित्रे, इराणचे ध्वज आणि निषेधाचे फलक होते. यावेळी जमावाने 'अमेरिका आणि इस्रायल' विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक से बढकर एक जलील, अमेरिका-इस्रायल अशा घोषणांनी श्रीनगरचे रस्ते दुमदुमले.


Hundreds March In Kashmir With Portraits Of Khamenei To Show Solidarity  With Iran | Republic World


श्रीनगरसह काश्मीरच्या विविध भागांतील इमामवाड्यांमध्येही लोक एकत्र आले असून तिथे शोकाकुळ वातावरण पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हे प्रदर्शन शांततापूर्ण मार्गाने सुरू असून कोठेही हिंसक वळण लागलेले नाही. मात्र, लोकांमध्ये असलेला आक्रोश पाहता पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान हाय अलर्टवर आहेत.



गुरुवारी-शुक्रवारी-शनिवारी सायंकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर भीषण हवाई हल्ले केले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, याच संघर्षादरम्यान खामेनेई यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि इतर वरिष्ठ नेते मारले गेल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण मध्य आशियात तणाव निर्माण झाला असतानाच, भारतातील काश्मीर खोऱ्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.


Iran–Israel conflict: Iran has run out of good options | Chatham House –  International Affairs Think Tank

हेही वाचा