दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचे नुकसान

पणजी : चोपडे येथील शिवोली पुलावर आज सकाळी ७ च्या दरम्यान कदंब बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून विदेशी कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. जखमीला तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.
बातमी अपडेट होत आहे.