अफगाणीस्तानातील काबूल, कंदाहारवर बॉम्बहल्ला

कराची : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afganisthan) यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशातील सीमेवर चकमकी वाढल्यानंतर आता पाकिस्तानने कंदाहार, काबूलवर बॉलहल्ला केला आणि सरळ युद्धाची (War) घोषणा केली. काबूलने सीमेवरील हल्ल्यात ५५ पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केल्यानंतर तणावात भर पडली. पाकिस्तानने या आठवड्याच्या सुरूवातीलाच अफगाणीस्तानवर प्राणघातक हवाई केल्ला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणच्या तालिबान सरकारने (Taliban Government) पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमचा संयम संपला आहे व उघड युद्ध सुरू झाले आहे.
कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न आणि आसिफची पोस्ट
उभय देशातील संघर्ष शिगेला पोहोचत असताना कतारकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संघर्ष थांबण्याचा चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देशांनी दोन्ही बाजूचे डझनभर सैनिक मारल्याचा दावा केला आहे. त्यात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ट्वीटरवर केलेला पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. ‘आमचा संयम संपला आहे. आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे’, असे आसिफ यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
अफगाणीस्तानचा दावा
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, पाकिस्तानने दक्षिणेकडील कंदाहार आणि आग्नेय प्रांत पक्तियामध्ये हवाई हल्ले केले. काबूलमध्ये किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, अफगाणीस्तानच्या राजधानीत झालेल्या हल्ल्यांचे नेमके ठिकाण किंवा संभाव्य जीवितहानी याविषयी माहिती मिळालेली नाही.
अफगाणीस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याला पत्युत्तर म्हणून अफगाणी सैन्याने गुरुवारी पाकिस्तानवर हल्ला केला.
पाकिस्तानचा दावा
पाकिस्तानच्या सैन्याने कंदाहार, काबूल आणि पक्तिया प्रांतातील अफगाण लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. दोन ब्रिगेड तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. पण जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
अफगाण तालिबानविरुद्ध इस्लामाबादने ऑपरेशन गझब लिल हक सुरू केल्याचे पाकिस्तानी मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी म्हटले आहे.