राजस्थानमधील बापेडिया कुटुंबार दु:खाचा डोंगर

जयपूर : गोटण, राजस्थान (Rajasthan) येथे ९ वर्षीय विद्यार्थीनी (Nine year old student)) शाळेच्या मैदानावर इतर मुलांबरोबर खेळत असताना कोसळली व गतप्राण झाली. ह्रदयविकाराच्या (Heart attack) झटक्याने मृत्यू पावली. चार महिन्यांपूर्वी तिचा भाऊही अशाच प्रकारे मृत्यू पावला होता.
मृत मुलीची ओळख दिव्या अशी असून, पाचवी इयत्तेत शिकत होती. ती तालनपूर येथील रहिवासी राजेंद्र बापेडिया यांची कन्या होती. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सकाळच्या प्रार्थनेस अजून वेळ असल्याने; शाळेच्या मैदानावर अनेक मुळे खेळ होती.
दिव्याही आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असताना अचानक तोल जाऊन कोसळली. आणि बेशुद्ध पडली. घटनेनंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या संमतीने शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, दिव्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिचा मोठा भाऊ अभिषेक याचाही सुमारे चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर २०२५ रोजी तो घरी खेळत असताना अचानक बेशुद्ध पडला होता. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले होते.
मात्र, डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले होते. अल्पावधीतच दोन भावंडांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने बापेडिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.