सं. ‘कधी तरी कोठे तरी’चा ठसा : अनिल आसोलकर उत्कृष्ट दिग्दर्शक

पणजी : ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत समर्थ थिएटर्स, गोवा या संस्थेच्या ‘संगीत कधी तरी कोठे तरी’ या नाटकास प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे या संस्थेच्या ‘संगीत पद्माराणी’ या नाटकास द्वितीय पारितोषिक, तर परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे, मुंबई या संस्थेच्या ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
संगीत नाट्य स्पर्धेचे अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक अनिल आसोलकर (संगीत कधी तरी कोठे तरी), द्वितीय पारितोषिक संजय नरहर (संगीत पद्माराणी), तृतीय पारितोषिक घनःश्याम जोशी (संगीत स्वरसम्राज्ञी).
नेपथ्य : प्रथम पारितोषिक विश्वास पांगारकर (संगीत पद्माराणी), द्वितीय पारितोषिक दत्तात्रय पुराणिक (संगीत वीज म्हणाली धरतीला), तृतीय पारितोषिक भास्कर शेटगावकर (संगीत कधी तरी कोठे तरी).
प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक संजय तोडणकर (संगीत सोन्याचा पिंजरा), द्वितीय पारितोषिक अशलेश गिमोणकर (संगीत कधी तरी कोठे तरी), तृतीय पारितोषिक अभिषेक कोयंडे (संगीत वीज म्हणाली धरतीला).
संगीतसाथ : तबला वादक प्रथम पारितोषिक विठ्ठल मेस्त्री (संगीत भर्तृहरी), द्वितीय पारितोषिक पुनित गडेकर (संगीत कधी तरी कोठे तरी), तृतीय पारितोषिक आदित्य तारी (संगीत तेजशलाका).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सूरज शेटगावकर, शारदा शेटकर (संगीत कधी तरी कोठे तरी) यांना जाहीर झाले आहे.
१४ नाट्यप्रयोग सादर
दि. ७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.