अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर नोबेल पुरस्कार?

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया यांनी आपला नोबेल पुरस्कार भेटवला डोनाल्ड ट्रम्प यांना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23 mins ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर नोबेल पुरस्कार?

वॉशिग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना अखेर नोबेल पुरस्कार (Nobel Award) मिळाला.  व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांनी आपल्याला मिळालेला नोबेल पुरस्कार ट्रम्प यांना भेटवला आहे. 

मचाडो आणि ट्रम्प यांच्यामध्ये गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर मचाडो यांनी आपल्याला मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्प यांना भेट दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करीत माहिती दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्याला पुरस्कार न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. 

नुकतीच अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई केली आणि आणि राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. एवढे सगळे घडले असतानाही व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या व नोबेल विजेत्या मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन आपला पुरस्कार भेट दिला. 

मारिया मचाडो यांनी व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. डोनाल्ड ट्रम्प यांना आज नोबेल शांतता पुरस्कार भेट दिला. आज व्हेनेझुएलासाठी ऐतिहासिक दिवस असून, राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर आमचा विश्वास असल्याचे मारिया मचाडो यांनी सांगितले.

पुरस्काराचे हस्तांतरण करता येत नाही : समिती

नोबेल पुरस्कार एकदा जाहीर झाल्यावर रद्द करता येत नाही. पुरस्कार कुणासोबत शेअरही करता येणार नाही व पुरस्काराचे हस्तांतरणही करता येणार नाही. हा अंतिम निर्णय असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा