एसआयरची प्रक्रिया १९ जानेवारी पर्यंत चालणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commissin) गोव्यासहीत (Goa) राजस्थान (Rajsthan), पुद्दुचेरी, लक्षद्दीप व पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीचा (एसआयआर) (SIR) भाग म्हणून मतदार यादीवर आक्षेप व दावे दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Election Officer) यांनी यासंदर्भात निर्देश जारी केला असून, त्यात एसआयआर प्रक्रिया १९ जानेवार, २०२६ पर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हरकती व दावे दाखल करण्यासाठी दिलेल्या वाढीव कालावधीबाबत व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व अधिकारी यांनी या नव्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याने आदेश देण्यात आले आहेत.