
पणजीः सरकारी नोकरीचे (Government Job) आमिष दाखवून लोकांकडून घेतलेले पैसे (Money) हे पुजा नाईकने स्वत: खर्च केले आहेत. आणखी कोणी मालक नाही. हे पैसे वसूल करण्याचे काम सुरू असून, न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूक झालेल्यांना त्यांचे पैसे परत मिळणार. नोकरीच्या आमिषाला लोकांनी बळी पडू नये; असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Mla Vijay Sardesai) यांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी ‘कॅश फॉर जॉब’ (Cash for Job) विषय सभागृहात मांडला. एका मंत्र्याला १७ कोटी दिल्याचा आरोप पुजा नाईक यांनी मीडीयात केला होता. पण कोटी रुपया सोडून केवळ २६ लाख रुपये एवढ्या लहान रकमेची सध्या चौकशी चालू आहे; असे उत्तर मिळाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
ही १७ कोटीची संख्या कुठून आली. जेव्हा एवढ्या पैशांचा हिशोब येतो; तेव्हा त्याची चौकशी इडीकडून व्हायला हवी पण तसे होत नाही. १७ कोटीतील किती खर्च केले आणि राहिलेले पैसे कुठे गेले त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. या पैशांचा शोध घेण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे उपाय आहेत? हे पैशांचे ऑडीट झाले आहे? असे प्रश्न आमदार सरदेसाई यांनी उपस्थित केले.
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. त्यानंतर या प्रकरणाचा शेवटचा अहवाल जारी करणार. आरोपींची सरकारने ४.४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आणि ती मालमत्ता विकून ज्यांची फसवणूक करण्यात आली आहे; त्यांना हे पैसे सरकार परत करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुजा नाईक यांच्या बॅंक खात्यात आणि इतर मालमत्ता धरून त्याचा हिशोब १७ कोटी एवढा होतो. तिने स्वत: हे पैसे घेतले आहेत आणि स्वत:च खर्च केले आहेत. हे पैसे दिने लक्झरी गाड्या, विदेश दौरे, फ्लॅटांवर खर्च केले आहेत. पुजाची एकट्याचीच ४ कोटी एवढी मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.