आतापर्यंत एकूण २०८ उमेदवारांचे अर्ज दाखल

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (ZP election Goa) सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी राज्यभरातून १३२ उमेदवारांनी अर्ज भरले.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू झाली. सोमवार दि. ८ डिसेंबरपर्यंत उत्तर (North Goa) आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) सर्व ५० मतदारसंघांतून आतापर्यंत एकूण २०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उत्तर गोव्यातून ११३, तर दक्षिण गोव्यातून ९५ अर्ज भरण्यात आले आहेत.
सोमवारी उत्तरेतून ७२ आणि दक्षिणेतून ६० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात भाजपच्या उमेदवारांनी उत्तरेतून २३, दक्षिणेतून १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच काँग्रेसतर्फे उत्तरेतून १२, दक्षिणेतून १० अर्ज भरण्यात आले. आम आदमी पार्टीतर्फे उत्तरेतून २१, तर दक्षिणेतून १६ अर्ज दाखल झाले. गोवा फॉरवर्डचे उत्तरेतून ५, दक्षिणेतून २ अर्ज दाखल करण्यात आले. मगो पक्षाच्या २ उमेदवारांनी दक्षिणेतून अर्ज दाखल केले आहेत, तर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या एकाच उमेदवाराने उत्तरेतून अर्ज दाखल केला आहे. उत्तरेतून १० अपक्ष उमेदवारांनी, तर दक्षिणेतून १४ अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी पक्षामार्फत डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आज शेवटचा दिवस
मंगळवार दि. ९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. बुधवार दि. १० डिसेंबर रोजी अर्ज अर्जांची छाननी होणार असून गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.