: आतापर्यंत ५ जणांना अटक

पणजी : गोव्यातील (Goa) हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन‘ क्लब (Birch by romeo lane club, Goa) आग (Fire) दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी (Goa Police) आणखी एकाला अटक केली. क्लबचे कामकाज पाहणारा करण सिंग कोहली (४९) याला अटक करण्यात आली. याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी क्लबच्या मालकांना शोधण्यासाठी एक पथक दिल्लीला गेले आहे.
हडफडे येथील क्लबला लागलेल्या आगीत २५ जण मृत्यू पावले तर ६ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आगीच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे. अटक करण्यात आलेला भरत सिंग कोहली हा क्लबचे कामकाज पाहत होता. याप्रकरणी पोलीस सध्या सखोल तपास करीत आहेत.
क्लबला विविध परवानगी दिलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांनी मालक सौरभ व गौरव लुथरा या दोघांविरद्ध यापूर्वीच ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. दोघेही विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने देशातील विमानतळांना व पोलीस स्थानकांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.