
वास्को : वान्या व गीतेश या भावंडांनी अनुक्रमे ‘ज्युनियर मिस इंडिया २०२५’ (Junior Miss India 2025) व ‘मिनी प्रिन्स ऑफ गोवा २०२५’ (Mini Prince of Goa 2025) या स्पर्धा जिंकताना उल्लेखनीय कामगिरी गेली. वान्या गिरीश सातार्डेकर व गीतेश यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
वान्या गिरीश सातार्डेकर आणि गीतेश गिरीश सातार्डेकर यांच्या भावंडांनी अनुक्रमे 'ज्युनियर मिस इंडिया २०२५' आणि 'मिनी प्रिन्स ऑफ गोवा २०२५' जिंकून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. वान्याने 'ज्युनियर मिस इंडिया २०२५', ‘मिस पॉप्युलर' तर 'गितेश' 'मिनी मस्त इंडिया २०२५ मस्त पॉप्युलर' हा किताबही जिंकला. २०२५ मध्ये ही त्यांची सलग पाचवी आणि चौथी विजयी कामगिरी आहे. ‘स्टार फॅशन ब्युटी पेजंट’ आणि ‘टॅलेंट हंट शो २०२५’ मध्ये मॉडेलिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि यशाबद्दल दोघांचाही सत्कार करण्यात आला. ब्युटी पेजंटचे आयोजन शायनिंग स्टारचे संचालक रसेश बोंद्रे यांनी केले.