रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

मडगाव : गोव्यात (Goa) काजू बागायतीमध्ये (Cashew Plantation) साफसफाईसाठी गेलेल्या राम गोविंद गावकर (रा. बेंदुर्डे, कुंकळळी) यांच्यावर रानडुकराने (Wild boar) हल्ला केला. यात जखमी गावकर यांचा मृत्यू झाला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, बेंदुर्डे, कुंकळळी येथील रहिवासी  राम गोविंद गावकर हा जंगलात काजू बागायतीमध्ये साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात जखमी राम घटनास्थळीच पडला होता. कुटुंबीयांनी त्याला बाळळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत्यू पावल्याचे स्पष्ट केले. यानंतर कुंकळळी पोलिसांना (Cuncolim Police) याची माहिती दिली. पोलिसांनी राम यांचे भाऊ रमेश गावकर व मुलगा सत्येंद्र गावकर यांच्याकडे चौकशी केली असता जंगलात काजू बागायतीत साफसफाई साठी गेले असता रानडुकराने हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले.

कुंकळळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात घातपाताचा संशय नाकारलेला आहे. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा