२५ मृतांपैकी १९ जणांचे शवविच्छेदन : १६ जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
२५ मृतांपैकी १९ जणांचे शवविच्छेदन : १६ जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

पणजी : गोव्यातील (Goa) हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन (Birch by Romeo lane club) येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी १९ जणांचे शवविच्छेदन (Post mortem) पूर्ण झाले. शवविच्छेदनानंतर सोळा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत, असे आरोग्य सचिव यतिंद्र मरळकर यांनी सांगितले.

मृतांचे कुटुंब‌ीय जसे येणार तसे शवविच्छेदन करण्यात येणार. शवविच्छेदन होताच मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येतील. नेपाळसह इतर राज्यांमध्ये मृतदेह पोहोचवण्याची व्यवस्था सरकार करणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.  मृतदेह पोहोचवण्याची व्यवस्था सुरू आहे.

दरम्यान, आगीत जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देतात. जखमी आतिश मेहता यांची प्रकृती सुधारताच आज संध्याकाळपर्यंत त्यांना घरी सोडण्यात येईल, असे आरोग्य सचिव यतिंद्र मरळकर यांनी सांगितले.

हेही वाचा