चौकशी समितीने बर्च बाय रोमियो लेन क्लबची तपासणी केली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
चौकशी समितीने बर्च बाय रोमियो लेन क्लबची तपासणी केली

पणजी : दंडाधिकाऱ्यांच्या (Magistrate) अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने (Inquiry Committee) आगीत (Fire) भस्मसात झालेल्या बर्च बाय रोमिओ लेन क्लबची (Club) तपासणी केली आणि सीसीटीव्ही फूटेजचा (CCTV footage) डीव्हीआर (DVR)  जप्त केला. फॉरेन्सिक सायन्स डीव्हीआरमधील फूटेजची तपासणी करणार. चौकशी समितीने क्लबची सखोल तपासणी केली आणि यंत्रणेबद्दल माहिती घेतली, असे चौकशी समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी सांगितले.

आगीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल, त्यावेळी असलेले लोक आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेतली जाणार आहे. क्लबमधील अग्निशामक यंत्रणेची स्थिती आणि इतर सुरक्षा उपायांची स्थिती जाणून घेणार.  खात्याचे अधिकारी,  पंचायतींच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार समितीला आहे. कागदपत्रे तसेच संबंधितांची चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला जाईल, असे जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी सांगितले.

क्लबला लागलेल्या आगीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. त्यानंतर सोमवारी समिती स्थापन केल्याचा आदेश जारी करण्यात आला. चौकशी समितीच्या सर्व सदस्यांनी क्लबची पाहणी केली आणि चौकशी सुरू केली. 

समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत:

 अध्यक्ष - अंकीत यादव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी

टीकमसिंग वर्मा, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक

आशुतोष आपटे, फॉरेन्सिक सायन्स, संचालक

राजेंद्र हळदणकर, उपसंचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा


चौकशी समितीच्या जबाबदाऱ्या:

- आगीची कारणे शोधणे

- आवश्यक परवाने तपासणे

- एजन्सी/विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून उपाययोजनांची शिफारस

- विभागाकडून रेकॉर्ड आणि कागदपत्रे मागवून समन्स जारी करून चौकशीचे अधिकार

हेही वाचा