विमानतळांवरही अलर्ट

पणजी : हडफडे, गोवा (Arpora, Goa) येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या वादग्रस्त क्लबला शनिवारी लागलेल्या भीषण आगीत २५ जण मृत्यू पावले होते. याप्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) क्लब मालक (Club Owner) सौरभ व गौरव लुथरा या दोघांविरुद्ध ‘लूक आऊट’ (Look out Notice) नोटीस जारी केली आहे. विमानतळ (Airport) व पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर दोघेही देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सर्व विमानतळ व पोलीस स्थानकांना सतर्क करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर सौरभ लुथराने सोशल मिडियावर (Social Media) प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, या दुर्घटनेनंतर व्यवस्थापन पूर्णपणे हादरले आहे. ही दुर्देवी घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे व्यवस्थापन तीव्र दु:ख व्यक्त करते. या दुर्घटनेत ठार झालेल्यांच्य कुटुंबियांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे लुथरा यांनी म्हटले आहे.
घटनेचे तीव्र पडसाद
दरम्यान, वरील दुर्घटनेत २५ जण मृत्यू पावले असून, ६ जण जखमी झाले आहेत. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. वादग्रस्त क्लबची व एकूण दुर्घटनेची सखोल चौकशी करून, जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीने जोर धरला आहे.