निर्माते आभासी जग निर्माण करण्यात यशस्वी : पुरोहित


28th November 2017, 11:59 pm
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चित्रपट निर्माते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपटात आभासी जग निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. यापुढील तंत्रज्ञान म्हणून ३६० अंशातून होणाऱ्या छायाचित्रणाकडे पाहता येईल, अशी माहिती आकाश पुरोहित यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
चित्रीकरणासाठी ३६० अंशांतून छायाचित्रण करणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेसाठी मिथीक काझमी, ग्रेग अकुना आणि राहुल तिडके उपस्थित होते. या तंत्रज्ञानाचा वापर मोबाईलद्वारेही चित्रीकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामाध्यमातून केलेले चित्रिकरण खऱ्याखुरे जग आपल्यासमोर उभे करतो, असेही पुरोहित यांनी सांगितले. ग्रेग म्हणाले की, २०-२५ वर्षांपूर्वी वापरात असलेले तंत्र आता कालबाह्य झाले आहे. त्यामुळे लोकांना नित्य नव्याचा ध्यास असतो. त्यातूनच अशा प्रकारच्या तंत्राचा जन्म होतो. लोकांना नवे जग खुले होत आहे.