पेडे म्हापशात जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 11:37 pm
पेडे म्हापशात जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया

म्हापसा : पेडे म्हापसा येथे सर्व्हिस रोडवरील जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. ही ११० एमएम क्षमतेची जलवाहिनी असून तिच्यामार्फत पेडे भागातील नळांना पाणी पुरवठा होतो.

ही घटना रविवारी संध्याकाळी ५ वा. सुमारास घडली. पेडे जंक्शनजवळील वेगीस रेस्टॉरन्टनजिक सर्व्हिस रोडच्या खालून गेलेली जलवाहिनी फुटली. वाहनांच्या वाहतुकीमुळे दाब पडून ही जलवाहिनी फुटल्याचा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच साबांखाच्या पाणी पुरवठा विभागाने तत्काळ या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद केला. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली होती.

दरम्यान, या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळी हाती घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा