समुद्रकिनारी बेकायदेशीर भिंत; शिरदोणवासीय करणार तक्रार

भिंत पाडण्यासाठी ठेकेदाराला शनिवारपर्यंत मुदत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 11:41 pm
समुद्रकिनारी बेकायदेशीर भिंत; शिरदोणवासीय करणार तक्रार

पणजी : समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर भिंत बांधल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय शिरदोणवासीयांनी घेतला आहे. ही भिंत पाडण्यासाठी ठेकेदाराला शनिवारपर्यंत मुदत दिली असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

शिरदोण येथे रविवारी झालेल्या बैठकीत स्थानिक आमदार वीरेश बोरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर भिंत बांधण्यात आली असून लोखंडी खांबही आहेत. आराखड्यात कोणत्याही भिंतीचा उल्लेख नसल्यामुळे स्थानिक लोक ठेकेदार आणि जीटीडीसीच्या विरोधात तक्रार करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे बोरकर म्हणाले.

बोरकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिरदोण पंचायत, आगशी पोलीस स्टेशन, पर्यटन विभाग आणि इतरांकडे तक्रार केली जाणार आहे. बेकायदेशीर भिंत बांधकाम रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी पंचायत अधिकाऱ्यांवरही टीका केली.

स्थानिकांचा विरोध असूनही पंचायतीने बेकायदेशीर भिंत बांधकामावर कारवाई केली नाही, असेही बोरकर यांनी सांगितले. 

हेही वाचा