पारंपरिक व्यवसायांत शेकडो रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता!

प्रगतशील शेतकरी राजाराम मावळणकर : काजूच्या व्यवसायातून अडिचशे जणांना दिला रोजगार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 11:56 pm
पारंपरिक व्यवसायांत शेकडो रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता!

पेडणे : कुठलाही व्यवसाय करण्यास लाज बाळगू नये. कष्ट करा, मेहनतीने कमवलेले फळ आणि त्याची चव ही आयुष्यभर लक्षात राहते. कोणताही व्यवसाय मग तो पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय असला तरी सुद्धा त्यातून शेकडो बेरोजगारी युवकांना रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे, असे मत कडशी-मोपा येथील प्रगतशील शेतकरी राजाराम मावळणकर यांनी व्यक्त केले.
कामगारावर विसंबून न राहता सुरुवातीला घरच्या मंडळींच्या सहकार्याने पारंपरिक व्यवसायाला सुरुवात केली. एक एक पाऊल टाकत राजाराम मावळणकर यांनी शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण केली आहे. जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त बेरोजगार युवकांना मावळणकर यांनी पारंपरिक व्यवसायातून रोजगार देण्याची किमया साध्य केली आहे.
राजाराम मावळणकर यांचा पारंपरिक पद्धतीने काजू बोंडूपासून हुर्राक तयार करणे आणि मावळणकर नंबर वन ब्रँड काजूगरही त्यांच्याच बागायतीत उपलब्ध आहे. जाे गोवा, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत.
मावळणकर यांनी लाखो चौरस मीटर जमिनीमध्ये शेती बागायती बरोबरच काजू बागायतींना प्राधान्य देत असताना वेगवेगळ्या फळांची झाडांची लागवड माळरानावर केली आहे. या माध्यमातून पेडणे तालुक्याबरोबरच शेजारच्या सिंधुदुर्ग भागातही शेकडो रोजगार निर्माण केले आहेत.
गोव्यात सर्वांत प्रथम हुराक, काजूची फेणी राजाराम मावळणकर यांच्या बागायतीमध्ये उपलब्ध असते. व्यावसायिकांनी पुढील भवितव्याचा विचार करून जर डोंगर, माळारानावर वेगवेगळ्या जातीच्या काजूंची लागवड करून झाडांची निगा राखावी, असा संदेश राजाराम मावळणकर यांनी दिला.
सबबी नको, कष्ट करा; फळ नक्की मिळेल!
शेती, बागायत करत असतानाच रानटी जनावरही देखील नासधूस नुकसानी करत असतात .परंतु वारंवार नुकसानी करत आहेत. म्हणून शेती सोडून द्यायची नाही. या व्यवसायामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल तर सरकारी नोकरीची काय गरज? सरकारी नोकरी पेक्षा तुम्ही या व्यवसायात दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. शिवाय बेरोजगारांना संधी देऊ शकता. तुमचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी अगोदर प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला यश नक्की मिळेल, असा संदेश राजाराम मावळणकर हे देतात.

हेही वाचा