सलमान, कतरिनाच्या हस्ते उद्या इफ्फीचा समारोप


27th November 2017, 03:49 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राजधानी पणजीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) मंगळवारी सांगता होणार आहे. समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ उपस्थित राहणार आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणार आहे.
दरम्यान, समारोप सोहळ्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक पाब्लो सिझर यांचा रवींंद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित ‘थिकिंग ऑफ हिम' चित्रपट दाखविला जाणार आहे.