मोदी सरकार म्हादईबाबत गॅरंटी देण्यात अपयशी : मनोज परब

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 12:00 am
मोदी सरकार म्हादईबाबत गॅरंटी देण्यात अपयशी : मनोज परब

पत्रकार परिषदेत बोतलना मनोज परब.

पणजी : वास्को येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मात्र त्या सभेमध्ये गोवेकरांची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदी विषयी गॅरंटी देण्यात मोदी पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीक आजी पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजप-काँग्रेसने हातमिळवणी करून कर्नाटककडे सौदा केला. त्याबद्दल एक शब्दही मोदींनी आपल्या भाषणात काढला नाही. राज्यातील भाजप व काँग्रेस पक्षांनी म्हादईबद्दल गॅरंट्या देऊन जनतेची भरपूर दिशाभूल केली. मात्र गोवेकराना पंतप्रधान मोदींकडून म्हादईबाबत गॅरंटीची देण्याची अपेक्षा होती. परंतु ते ती गॅरंटी देण्यात अपयशी ठरले असे मनोज परब म्हणाले.
म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी असल्याचे काँग्रेस व भाजपकडून वारंवार छाती ठोकून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही राजकीय पक्षांनी अक्षरशः राजकीय स्वार्थासाठी सौदा केला आहे. कर्नाटकमध्ये यापूर्वी भाजपचे सरकार होते. तेव्हा त्यांनी कळसा भंडूरा प्रकल्पाच्या डीपीआरला स्थगिती दिली नव्हती. आता काँग्रेसचे सरकार आहे. तरीही गोव्यातील काँग्रेस पक्ष म्हादईबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. हे दोन्ही पक्ष स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी गोवेकरांचा वापर करत आहे, असा आरोप मनोज परब यांनी केला.