सर्वसामान्यांनाही इफ्फीचा लाभ


27th November 2017, 03:50 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सर्वांनाच आनंद घेता यावा, यासाठी यावर्षी गोवा मनोरंजन संस्थेने कांपाल येथील महावीर उद्यानात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील बायोस्कोप कट्टा आणि स्टुडिओमधील कार्यक्रम स्थानिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर मुले विविध खेळांचा आनंद लुटत आहेत.
इफ्फी प्रतिनिधी म्हणून ज्यांनी नोंदणी केलेली नाही. परंतु हा सोहळा अनुभवता यावा, अशी इच्छा असलेल्यांची यावर्षी कांपाल येथील उपक्रमांमुळे व्यवस्था झाली. उद्यानात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने त्यांचा लाभ अनेकांना मिळत आहे. शिवाय देश-विदेशातील कलाकारांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना उपलब्ध होत आहे. दरम्यान, इफ्फी महोत्सव स्थळाच्या चौकटीत सादर होणाऱ्या विविध गोष्टी यावेळी सर्वसामान्य प्रेक्षकांसाठीही उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे प्रदर्शित होणारे बालचित्रपटही मुलांना भावत आहेत.