कळंगुटमध्ये झाड कोसळून पर्यटक जखमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December, 11:34 pm
कळंगुटमध्ये झाड कोसळून पर्यटक जखमी

म्हापसा : परबावाडो कळंगुट येथे एका आंब्याच्या झाडाची एक भलीमोठी फांदी पर्यटकांच्या जीप व दुचाकीवर कोसळली. या घटनेत शाह कुटुंबातील सर्वजण किरकोळ जखमी होऊन चमत्कारिकरित्या बचावले. फक्त चौघांना किरकोळ दुखापत झाली. एक दुचाकीस्वारही फांदीखाली अडकला गेला.

ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यातील एकाला घरी पाठवण्यात आले तर तिघांना पुढील उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले.

नंतर तिथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व झाड कापून बाजूला केले. कळंगुट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.