
पणजी : काँग्रेसच्या (Congress Party) पहिल्या यादीनंतर आरजीनेही (RG Party) उमेदवार जाहीर केल्याने विरोधकांची युती तुटल्याचे दिसत असले तरी अखेरपर्यंत युतीसाठी प्रयत्न असतील, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर आरजीला नव्याने प्रस्ताव दिला आहे. यावर आज सायंकाळच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
भाजपचे (BJP) उमेदवार जाहीर होऊन प्रचार शीगेला पोचला असला तरी विरोधी पक्षांच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ज्या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेले आहेत, त्या मतदारसंघात आरजीने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांची युती व्हावी, असे प्रयत्न आहेत. काँग्रेसला युती हवी आहे. कोणाला नको असल्यास मी काहीच करू शकत नाही, असे अमित पाटकर म्हणाले.