विकास, प्रगतीसाठी शांतता असणे आवश्यक

धर्मगुरुंचा संदेश : मुख्यमंत्री, मंत्र्यांसह फेस्ताला मोठ्या प्रमाणात सामान्यांची उपस्थिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 05:37 pm
विकास, प्रगतीसाठी शांतता असणे आवश्यक

पणजी : पोर्टब्लेअरचे धर्मगुरू (फादर) आलेशो दे ईस, फादर सीमीआव फर्नांडिस, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांच्यासह इतर धर्मगुरूंनी फेस्ताच्या दिनी गोमंतकीयांना शांतीचा संदेश दिला. विकास तसेच प्रगतीसाठी शांतता असणे आवश्यक आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी दिलेला शांतीचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणायला हवा, असे आवाहन धर्मगुरूंनी फेस्ताच्या प्रार्थना संदेशात दिले.

काँग्रेस नेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही फेस्तानिमित्त गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या. आज सेंट झेवियर फेस्तानिमित्त जुने गोवे चर्च परिसरात भाविक व सामान्य जनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा यांच्यासह इतर अनेक आमदारांची उपस्थिती होते. भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोई सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेंट झेवियर फेस्ताच्या शुभेच्छा देताना सांगितले. 

गोव्यासह बेळगाव, कोल्हापूरातील भाविकांची उपस्थिती

गोव्यासह बेळगाव, सावंतवाडी, कोल्हापूर येथूनही भाविक फेस्ताला आले होते. फेस्तानिमित्त दिवसभर प्रार्थनासभा सुरू आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तानिमित्त सर्व धर्मातील बांधव एकत्र जमतात. फेस्तानिमित्त भरलेल्या फेरीत कपडे, खाद्यपदार्थ, भांडी, खेळणी यांचे विविध स्टॉल्स भरले आहेत. खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.


हेही वाचा