
मडगाव: दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, नागरकोइल जंक्शन - मडगाव जंक्शन - नागरकोइल जंक्शन एक्सप्रेस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
रेल्वे क्रमांक ०६०८३ (नागरकोइल जंक्शन - मडगाव जंक्शन एक्सप्रेस स्पेशल): ही गाडी २३ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत दर मंगळवारी नागरकोइल जंक्शनवरून रात्री ११.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०६०८४ (मडगाव जंक्शन - नागरकोइल जंक्शन एक्सप्रेस स्पेशल): ही गाडी २४ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ पर्यंत दर बुधवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता नागरकोइल जंक्शनला पोहोचेल.
थांबे आणि डबे
ही विशेष रेल्वे २१ डब्यांची असणार आहे. ही गाडी एरनिएल, कुलितुराई, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कोल्लम जंक्शन, कयानकुलम जंक्शन, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाऊन, अलुवा, थ्रिसूर जंक्शन, शोरानूर जंक्शन येथे थांबेल. तसेच, कोझिकोडे, वडाकारा, थलासेरी, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जंक्शन, सुरतकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बाइंदूर, मुर्डेश्वर, कुमठा आणि कारवार या स्थानकांवरही तिचा थांबा असेल.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.