कांदोळीतील हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

कळंगुट पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 04:26 pm
कांदोळीतील हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

पणजी: गोव्यात सुट्टीसाठी सहकुटुंब आलेल्या पतीयाळा (पंजाब) येथील ४१ वर्षीय हरिंदरजीत यांचा कांदोळी येथील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी पहाटे ही घटना घडली. 

कळंगुट पोलिसांना काल पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी या अपघाताची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतींमुळे पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृतदेह तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येथे आला आहे.

या घटनेची नोंद कळंगुट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अपघाती मृत्यू म्हणून केली आहे. घटनेचा नेमका क्रम निश्चित करण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.

हेही वाचा