
वास्को : अनेक अडथळ्यांमुळे इंडिगो कंपनीच्या (Indigo Company)) विमान (Flight) सेवेवर परिणाम झाला आहे. गुरुवारी दाबोळी विमानतळावरील (Dabolim)११ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर काही विमाने उशीरा येत आहेत.
इंडिगो कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार रद्द करण्यात आलेल्या विमानात ६इ७४४ हैदराबादला जाणारे, ६इ२९७ मुंबई, ६इ१६२ कोलकाता, ६इ५१४३ मुंबई, ६इ२०५ मुंबई, ६इ४१८ सुरत या विमानांचा समावेश आहे.
दरम्यान, इंडिगो कंपनीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून अनेक कारणांमुळे इंडिगोच्या विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमानसेवेवर परिणाम झाल्याने व विमाने रद्द करावी लागल्याने, विमान प्रवाशांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करतो व प्रवाशांची माफी मागतो.
अनेक कारणांमुळे विमानसेवेवर परिणाम झाला असून, त्यात तांत्रिक अडचणी, हिवाळ्यामुळे वेळापत्रकात करावे लागलेले बदल, खराब हवामानाचा परिणाम तसेच अन्य काही कारणांमुळे विमान सेवेवर परिणाम झाल्याचे इंडिगो कंपनीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.