जिल्हा पंचायत निवडणूक : भाजपच्या ७ तर कॉंग्रेसच्या १ उमेदवाराचा अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
जिल्हा पंचायत निवडणूक : भाजपच्या ७ तर कॉंग्रेसच्या १ उमेदवाराचा अर्ज दाखल

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) राजकीय पक्ष (Political Party) उमेदवारांची घोषणा करीत असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करणेही सुरू आहे. गुरुवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या ७ तर कॉंग्रेसच्या १ उमेदवाराने अर्ज दाखल केला. त्याचबरोबर ३ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. यापूर्वी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

 आजच्या ११ अर्जांसहीत एकूण १२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (Goa State Election Commission)  ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या फ्रॅंझीलीया रॉड्र‌िग्ज (कळंगुट), अमीत अस्नोडकर (सुकुर), रेष्मा संदीप बांदोडकर व सुष्मिता पेडणेकर (रेईश मागूश), संदीप साळगावकर (पेन्ह द फ्रान्स), मोहन गावकर (सावर्डे) व रुपेश देसाई (धारबांदोडा) यांनी अर्ज सादर केले आहेत. रेईश मागूश मतदारसंघात भाजपच्या दोघा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

उजगाव -गांजे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मनीषा शेणवी उजगावकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय दिक्षा पागी, विपीन गावकर (पैंगीण), सुनील जल्मी (बेतकी - खांडोळा) या अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यापूर्वी वेळ्ळी मतदारसंघात जॉन पेरेरा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. 

हेही वाचा