बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ : एनडीए १९१ जागांवर आघाडीवर

महागठबंधन दुसऱ्या स्थानी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ : एनडीए १९१ जागांवर आघाडीवर

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar assembly elections )मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे.  सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए (National Democratic Alliance (NDA) बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत आहे तर महागठबंधन (Mahagathbandhan) दुसऱ्या स्थानी आहे. 

 सकाळी १० वाजताच्या ट्रेंडनुसार एनडीए १६३ जागांवर आघाडीवर होते तर महाआघाडी ७७ जागांवर आघाडीवर होते.  जेडीयु ८२ तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर होते. नंतर एनडीएची आघाडी आणखी वाढून १९१ वर पोहोचली.  

सकाळी १० वाजताच्या ट्रेंडमध्ये एनडीए १६३ जागांवर आघाडीवर तर महाआघाडी ७७ जागांवर आघाडीवर. भारतीय जनता पक्षाने (भाजप) ५० जागांचा आकडा ओलांडला होता व ७० जागांवर आघाडीवर होते. त्यानंतर भाजप व जेडीयूची आघाडी आणखी वाढली. 

महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या गायिका मैथिली ठाकूर अलीनगरमध्ये आघाडीवर आहेत.

सर्व २४३ विधानसभा जागांवर झालेल्या मतदानाच्या निकालांवरून हे ठरेल की राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार सलग पाचव्यांदा सत्तेत येतील की सरकारमध्ये बदल होईल.

६ आणि ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या २४३ सदस्यीय विधानसभेच्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यात ६७.१३% इतके ऐतिहासिक मतदान झाले होते.

बहुतेक एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये जेडी(यू) हा एक भाग आहे. तेजस्वी यादव यांनी हे भाकित फेटाळून लावले आहेत आणि असा दावा केला आहे की महाआघाडी प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.

तेजस्वी यादव यांच्याव्यतिरिक्त, दोन्ही आघाडीच्या प्रमुख उमेदवारांमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा, जनशक्ती जनता दलाचे (जेजेडी) तेज प्रताप आणि बिहारचे काँग्रेस अध्यक्ष राजेश कुमार यांचा समावेश आहे.

हेही वाचा