११ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया २ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करा

गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
११ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया  २ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करा

पणजी : राज्यातील ११ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रीया २ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने गोवा राज्य निवडणूक आयो व इतर संबंधीतांना दिले आहेत. ११ नगरपालिकांची निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका निकालात काढताना उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

पेडणे, म्हापसा, डिचोली, वाळपई, मुरगाव, मडगाव, काणकोण, सांगे, केपे, कुडचडे- काकोडा,  कुंकळ्ळी या ११ नगरपालिकांची मुदत संपल्यानंतर सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. नगरपालिका निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या अध्यादेशाला ट्रॉजन डिमेलो व इतरांनी आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका निकालात काढली.  निवडणुकीची प्रक्रीया पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित झाल्याने याचिकादार ट्रॉजन डिमेलो यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा