महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप्तीस्त चर्चच्या पाद्रीला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप्तीस्त चर्चच्या पाद्रीला अटक

पणजी : राज्यातील एका बाप्तीस्त चर्चच्या पाद्रीला एका महिला अनुयायीला व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद संदेश पाठवून तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही काही काळ त्या पाद्रीच्या प्रवचन शिबिरांना उपस्थित राहत होती. तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित पाद्रीने केवळ अश्लील आणि अपमानकारक संदेश पाठवले नाहीत, तर तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने आपल्या अनुयायांमध्ये तिच्याविषयी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १७० अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला प्रतिबंधात्मक स्वरूपात अटक केली. त्यानंतर त्याला बीएनएसएसच्या कलम १२६ नुसार म्हापसा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट रेकॉर्ड पुराव्याच्या स्वरूपात पोलिसांनी जप्त केले आहेत.

दरम्यान, हा पाद्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा पहिलाच प्रसंग नाही. २०२१ साली राष्ट्रगीताचा अपमान करणारा त्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो त्या वेळीही चर्चेत आला होता.

हेही वाचा