खड्ड्यात दुचाकी पडून जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

चाररस्ता येथील घटना : गोमेकॉत सुरू होते उपचार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
खड्ड्यात दुचाकी पडून जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

काणकोण : पाळोळे येथील उपेंद्र रवींद्र बांदेकर (५५) हे सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चाररस्ता येथील खड्ड्यात दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना काणकोण इस्पितळात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मडगाव जिल्हा इस्पितळात व त्यानंतर बांबोळीच्या गोमेकॉत उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १ वा. पैंगीण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खड्ड्यात पडून बळी गेल्यावर बुजवले खड्डे

चाररस्ता येथील खड्ड्यात पडून उपेंद्र यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच बुधवारी सायंकाळी तेथील खड्डे बुजविण्यात आले. या खड्ड्यांमुळे आणखीन दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावरही इस्पितळात उपचार सुरू आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एकाचा नाहक बळी गेला, अशी खंत पाळोळे येथील नागरिकांनी व्यक्त केली. 

हेही वाचा