
नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government Employee) व पेन्शनधारकांना (Pensioner) आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) आठवा वेतन (8th Pay Commission) आयोग स्थापन करण्यासाठी अखेर मंजुरी दिली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शधारक याची वाट पाहत होते. १८ महिन्यांत आयोग आपल्या शिफारशी सादर करणार आहे. आठव्या वेतन आयोगाचा लाभ सुमारे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी व ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. आठव्या वेतन आयोगाला सरकारने या वर्षाच्या जानेवारी महिन्यात मंजूरी दिली होती. आता त्याच्या स्थापनेस ही मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटींना मान्यता दिली आहे.