‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा.

मुंबई : आपल्या विनोदी शैलीने हास्याचे कारंजे फुलवत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम (Sarabhai VS Sarabhai) अभिनेते सतीश शाह (७४ वर्षे) (Satish Shah)  काळाच्या पडद्याआड गेले आहेत. किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईतील हिंदुजा इस्पितळात (Hinduja Hospital) त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने  सिनेसृष्टीवर (Cinema) शोककळा पसरली आहे. 

चार दशके सिनेसृष्टीत कार्यरत 

गेली चार दशके सिनेसृष्टीत कार्यरत होते. विनोदी कलाकार (Comedian) म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याच्या अकाली निधनाने सिनेसृष्टी व दूरदर्शन वरील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 

अनेक भूमिका गाजवल्या

सतीश शहा यांची विनोदबुद्धी, टायमिंग व अभिनयशैली उत्कृष्ट होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. १९८३ साली त्यांनी सिनेसृष्टीत आगमन केले. प्रसिद्ध व्यंगचित्रपट ‘जाने भी दो यारो’मध्ये अनेक भूमिका साकारल्या व घराघरात पोचले. ‘हम साथ साथ है, ‘मैं हूं ना’, कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘ओम शांती ओम’ या सारख्या अनेक हिट चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणीय ठरल्या. आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले.  प्रत्येक भूमिकेशी समरस होत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट व वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय सादर करून बहुगुणी कलाकारी पेश केली. 

दूरदर्शनच्या पडद्यावरही सतीश शाह प्रचंड लोकप्र‌िय होते. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई ही भूमिका आजही भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रीय, संस्मरणीय विनोदी भूमिका असल्याचे मानले जाते. 


हेही वाचा