पंजाबच्या डीआयजीकडे कोट्यावधींचे घबाड : रोख ५ कोटी रूपये, दीड किलो सोने जप्त

५ लाख रुपयांची लाच घेताना सापडला जाळ्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
17th October, 09:49 am
पंजाबच्या डीआयजीकडे कोट्यावधींचे घबाड : रोख ५ कोटी रूपये, दीड किलो सोने जप्त

पंजाब : सरकारी अधिकारी, बाबू यांच्याकडे किती संपत्ती असेल याचा कुणी विचार करू शकतो काय? काही सरकारी बाबूंकडे सापडत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे रहस्य काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतो.  पंजाब पोलीस दलातील (Punjab Police) पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) हरचरण सिंग भुल्लर (Harcharan Singh Bhullar)  यांच्याकडे ५ कोटी रुपयांची रोख रक्कम, दीड किलो सोने, लक्झरी कार सापडल्या आहेत. पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर अधिक चौकशी सुरू झाली व सीबीआयने (CBI) त्यांच्या मोहाली येथील बंगला, कार्यालय व अन्य ठिकाणी धाड टाकली. त्यात वर नमूद केलेला खजिनाच सापडला. खजिना जप्त करण्यात आला. सापडलेल्या नोटांची मोजणी अजून सुरू आहे. त्याचबरोबर अन्य कुठे संपत्ती संपून लपवून ठेवली आहे का, याचा शोध ही घेतला जात आहे. सापडलेली संपत्ती कशी मिळवली याची माहिती ही घेतली जात आहे. 

हेही वाचा