राजस्थान : ह्रदय हेलावणारी दुर्घटना, अपघातात चार मित्र होरपळून दगावले

दोन दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत २० जण होरपळून ठार झाले होते

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
राजस्थान : ह्रदय हेलावणारी दुर्घटना, अपघातात चार मित्र होरपळून दगावले

बालोतरा : राजस्थान (Rajsthan) येथे ट्रेलर व कार यांची धडक बसून गुरूवारी झालेल्या अपघातात (accident)  चार मित्र ठार (4 died) झाले. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी जैसलमेर, जोधपूर हमरस्त्यावर एसी स्लिपर बस अचानक आगीच्या  (fire) विळख्यात सापडल्याने, झालेल्या अपघातात २० जण होरपळून मृत्यू (20 died) पावले होते. 

ट्रेलर व कारचा अपघात बालोतरा येथील मेगा हायवेजवळ सादा या गावात रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यात चार मित्र ठार झाले तर कार चालक गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडामालानी, डाबर येथील पाच युवक सिणधरी येथे नोकरीला गेले होते. यावेळी पुढून येणारी कार व ट्रेलची धडक बसली. त्यानंतर आग लागली.  आग एवढी भयानत होती की, त्यात प्रकाश (२८),  मोहन सिंह (३५), शंभु सिंह (२०), पंचाराम (२२) हे मित्र होरपळून ठार झाले. कारचालक दिलिप सिंग गंभीर जखमी झाले.

मृतदेहांची डीएनए चाचणी करणार 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारही युवक आगीत होरपळून मृत्यू पावले. ओळख पटवणेही कठीण बनले असून, डीएनए चाचणी करून ओळख पटवावी लागणार आहे. चारही मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले असून, सर्व सोपस्कार करून ओळख पटल्यानंतर कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहेत. 


हेही वाचा