पणजी : कारच्या बोनेटमध्ये बसून मांजराचा प्रवास; बाळ्ळी ते पणजी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी : कारच्या बोनेटमध्ये बसून मांजराचा प्रवास; बाळ्ळी ते पणजी

पणजी : कारच्या (Car) बोनेटमध्ये बसून मांजराने बाळ्ळी ते पणजीपर्यंत (Balli to Panjim) प्रवास केला. बोनेटच्या आत इंजिन खूपच गरम असते. त्यामुळे मांजराने (Cat) बोनेटच्या आत बसून केलेला सुरक्षित प्रवास आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. इंजिनची एवढी गरमी सोसून मांजराने कसा प्रवास केला असेल?

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बाळ्ळी येथील एक व्यक्ती आपली कार घेऊन बाळ्ळीहून पणजीला यायला बाहेर पडले. पणजी जवळ आली असताना, त्यांना आपल्या कारच्या बोनेटमधून कसला तरी आवाज आला. आवाज ऐकून त्यांनी कार थांबवली व बोनेट उघडून आत पाहिले असता, आपले घरचे मांजर आत बसलेले पाहिले.  बोनेटमध्ये आत मांजर असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी सुस्कारा सोडला. त्यानंतर पणजीत आल्यावर त्यांनी मांजरासाठी खास हवा आत येणारी टोपली घेतली व त्यात टाकून त्याला कार्यालयात आणले. त्यांनी कार्यालयातील इतरांना यासंदर्भात माहिती दिल्यावर मांजराचा बाळ्ळी ते पणजीपर्यंतच्या प्रवासाचा किस्सा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.  इंजिनच्या एवढ्या गरमीत मांजराने बाळ्ळी ते पणजीपर्यंत गाठलेले अंतर यासंदर्भात चर्चा रंगली. 

मांजर सुरक्षित एवढेच समाधान 

दरम्यान, मांजराच्या या अनेपेक्षित प्रवासाबद्दल सहकाऱ्यांनी त्याचायकडे वकीयहरणा केली.  यावर त्यांनी सांगितले की, आपण बाळ्ळीहून कार घेऊन पणजीला येण्यास बाहेर पडलो. पणजी जवळ आल्यावर कारच्या बोनेटमधून आवाज आला. त्यानंतर कार थांबवून पाहिले असता, आत मांजर होते. मांजर सुरक्षित  आहे, एवढेच समाधान असल्याचे ते म्हणाले. 

हेही वाचा