पत्रकार, न्यूज अॅंकर अंजना ओम कश्यप यांच्यावर गुन्हा : वाल्मिकी समाजाची तक्रार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पत्रकार, न्यूज अॅंकर अंजना ओम कश्यप यांच्यावर गुन्हा : वाल्मिकी समाजाची तक्रार

लुधियाना  : भारतीय वाल्मिकी धर्म समाज संघटनेने केलेल्या तक्रारीवरून लुधियाना पोलिसांनी ‘आज तक’च्या न्यूज अॅंकर तथा व्यवस्थापन संपादक अंजनी ओम कश्यप, इंडिया टुडे समुहाचे चेअरमन तथा मुख्य संपादक अरुण पुरी व इंडिया टुडे समुहाविरोधात गुन्हा (FIR) नोंदवला आहे.  समाजाच्या धार्मिक भावना (Religious feeling) दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 इंडिया टूडे समुहाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केलेल्या कार्यक्रमात संत वाल्मिकी यांच्यासंदर्भात घृणास्पद टिपण्या केल्या असल्याचे भारतीय वाल्मिकी धर्म समाज संघटनेने दाखले केलेल्या तक्रारीत म्हटले होते. कश्यप यांनी केलेल्या टिप्पण्या एकदम गंभीर व अपमानकारक असून, कश्यप यांच्या वक्तव्यामुळे देशातील वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या. याप्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास देशपातळीवर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

जाहीर माफी मागावी : भाविधस

अंजना ओम कश्यप यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भारतीय वाल्मिकी धर्म समाज संघटनेने (भाविधस) लावून धरली आहे. त्यांनी संत वाल्मिकी यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याप्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागावी, असे स्पष्ट केले आहे. भाविधसचे राष्ट्रीय समन्वयक यशपाल चौधरी यांनी यासंर्भात लुध‌ियानातील मोहल्ला घाटी येथील पोलीस ठाण्यात जाऊन अंजना ओम कश्यप यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 


हेही वाचा