गोवा : दोन वर्षांत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी चालकांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वा

एनसीआरबीच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा :  दोन वर्षांत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी चालकांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वा

पणजी: गोव्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकी चालकांची संख्या मागील काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या या अहवालानुसार, २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये रस्ते अपघातातील दुचाकी चालकांच्या मृत्यूंची संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. याउलट, याच कालावधीत चारचाकी चालकांच्या मृत्यूंची संख्या ९ टक्क्यांनी, तर पादचाऱ्यांच्या मृत्यूंची संख्या ७ टक्क्यांनी कमी झाली आहे.

एनसीआरबी अहवालानुसार आकडेवारी:

राज्यात २०२१ मध्ये एकूण २,८५० रस्ते अपघातांची नोंद झाली होती, ज्यात २२६ जणांचा मृत्यू झाला, तर ८५६ लोक जखमी झाले. या एकूण मृतांमध्ये १५१ दुचाकी चालक (६६.८१ टक्के) होते. तसेच, २९ चारचाकी चालकांचा (१९.२० टक्के) व ३४ पादचाऱ्यांचा (२२.५१ टक्के) मृत्यू झाला होता.

२०२३ मध्ये राज्यात एकूण २,८४८ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यात २९२ जणांचा मृत्यू झाला आणि १,१८० लोक जखमी झाले. या वेळी मृतांमध्ये २०७ दुचाकी चालक (७०.८० टक्के) होते. याशिवाय, २९ चारचाकी चालक (९.९३ टक्के) व ४४ पादचारी (१५.०५ टक्के) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, २०२२ मध्ये राज्यात ३,०१२ रस्ते अपघातांची नोंद झाली होती, ज्यात २७४ जणांचा मृत्यू झाला, तर १,०७१ जखमी झाले होते. या अपघातांमध्ये १८० दुचाकी चालक (६५.६९ टक्के) होते, तर २६ चारचाकी चालक (९.४८ टक्के) व ५४ पादचारी (१९.७० टक्के) यांचा मृत्यू झाला होता. तिन्ही वर्षांत राज्यातील रस्ते अपघातात सायकलस्वार (१५) तसेच ट्रक अथवा टेम्पो चालकांच्या (१३) मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा