टॅक्सी ऑपरेटर्सची आमदार जीत यांच्याशी चर्चा : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : आमदार आरोलकर
पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग शुल्कात झालेली वाढ कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मांद्रे मतदारसंघातील टॅक्सी ऑपरेटर्स व आमदार जीत आरोलकर यांची मांद्रे येथे बैठक संपन्न झाली. यावेळी टॅक्सी ऑपरेटर्सनी आमदार आरोलकर यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन ही आमदार आरोलकर यांनी त्यांना दिले.
यावेळी मोपा विमानतळावर तसेच अन्य टॅक्सी व्यवसायिकांनी टक्सी व्यवसाय बाबत त्यांना भेटसावणाऱ्या विविध समस्या आमदार जीत आरोलकर यांच्याकडे मांडल्या. मोपा विमानतळावर वारंवार पार्किंग शुल्क वाढवण्यात येत असल्याबद्दल टॅक्सी व्यवसायिकांना होणारा त्रास, तसेच या ठिकाणी व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या समस्या याबाबत टॅक्सी व्यवसायिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्या पुढे समस्या मांडल्या
यावेळी टॅक्सी व्यवसायिकांच्या वतीने त्यांना निवेदन सादर करून वाढवण्यात आलेले शुल्क तसेच इतर समस्या कमी करण्याबाबत मागणी केली.
यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांच्या कायदेशीर हितांचे रक्षण करण्यासाठी योग्य तो तोडगा काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा विषय उपस्थित करून त्यांच्याशी याबाबत चर्चा करतो असे आमदार आश्वासन जीत आरोलकर यांनी टॅक्सी व्यवसायिकांना दिले.