आकेत फ्लॅटला आग लागून एक लाखाचे नुकसान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
आकेत फ्लॅटला आग लागून एक लाखाचे नुकसान

मडगाव : आके, मडगाव येथील कॉस्ता फॅक्टरीच्या समोरील आकार हॅबिटाट या इमारतीतील रहिवासी फ्लॅटला (Flat) आग (fire) लागण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात एक लाखांचे नुकसान झालेले असून आगीवर नियंत्रण आणत मडगाव अग्निशामक दलाने 20 लाखांची मालमत्ता वाचवली.

मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव अग्निशामक दलाला मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता आग लागल्याचा कॉल आला. आकेतील कॉस्ता फॅक्टरीसमोरील आकार हॅबिटॅट या इमारतीतील रहिवासी फ्लॅटमध्ये एसी युनिटने पेट घेतला होता. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एसी युनिटमुळे लागलेल्या आगीत फ्लॅटमधील फॅन, खुर्च्या, इलेक्ट्रीक वायरिंग आदी जळाले. यात घरातील भिंतींही तापल्याने रंग उडून गेलेला आहे. मडगाव अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणून आजूबाजूची तपासणी केली. या आगीच्या घटनेत एक लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले असून 20 लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आलेले आहे. 


हेही वाचा