पणजी : गोवा सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. क श्रेणीतील कर्मचारी तसेच ब श्रेणीतील (बिगर राजपत्रित) कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०२५पर्यंत रूपये ४६०० व याहून अधिक ग्रेडची वेतनश्रेणी लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नाही. पात्र कर्मचाऱ्यांना ई पेमेंटच्या आधारे २० ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा यापूर्वी बोनसची रक्कम मिळणार आहे.