वास्को कुळे रेल्वे 16 पासून एक महिना रद्द


3 hours ago
वास्को कुळे रेल्वे 16 पासून एक महिना रद्द

मडगाव : वास्को सांकवाळ कांसावली या विभागादरम्यान लाईन ब्लॉक व पॉवर ब्लॉकचे काम करावयाचे आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेकडून (Railway) 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर असे 31 दिवसांच्या कालावधीत वास्को कुळे वास्को ही डेमो (Demo) रेल्वे रद्द केलेली आहे. 

  दक्षिण पश्चिम रेल्वेने अधिसूचित केल्यानुसार 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या 31 दिवसांच्या कालावधीत वास्को द गामा - सांकवाळ - कांसावली विभागादरम्यान लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक आणि 28 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर या कालावधीत म्हैसूर विभागातील म्हैसूर जंक्शन - नागनहल्ली विभागादरम्यान लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉकचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी रेल्वे क्रमांक 56964 ही वास्को ते कुळे डेमू व रेल्वे क्रमांक 56963 कुळे ते वास्को द गामा डेमू प्रवास हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तर रेल्वे क्रमांक 16586 मुर्डेश्वर ते सर विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरु एक्स्प्रेसचा प्रवास 28, 30 ऑक्टोबर व  18, 20, 25, 27 नोव्हेंबर, 16, 18 डिसेंबर यादिवशी सुरु राहणार आहे.