महिन्याला १०० कोटींची कमाई की फसवणुकीचा खेळ?

नेटवर्क मार्केटींगचा फेकू रवी शर्माचे सत्य काय?

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
महिन्याला १०० कोटींची कमाई की फसवणुकीचा खेळ?

राजस्थान : महिन्याला तब्बल १०० कोटी रुपयांची कमाई, अनेक विमानतळांवर (Airport)  प्रवेश, खाजगी जेट, लक्झरी गाड्यांचा ताफा आणि अनेक शहरांमध्ये कोट्यवधींची संपत्ती  (Crores of rupees property)

असा दावा करणारा रवी शर्मा हा राजस्थानातील युवक सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटवर्किंग मार्केटिंगच्या (Networking Marketing) रवी शर्माचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले असून, त्याच्या बोलण्यावर अनेक जण विश्वासही ठेवत आहेत. आणि त्याची खिल्लीही उडवत आहेत. तो या साऱ्या गोष्टी बिनधास्तपणे फेकून लोकांना मुर्खात काढत आहे. 

व्हायरल व्हिडिओंमध्ये रवी शर्मा सांगतो की, त्याची महिन्याला १०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्याच्याकडे मर्सिडिस, बीएमडब्ल्यू, ऑडी, स्कॉडा, स्कॉर्पिओ, सेल्टोस अशा महागड्या गाड्यांचा ताफा असल्याचा तो दावा करतो. मॉल्स, जमीन, महागडी घड्याळे व हे सर्व आपण कसे खरेदी केले याची सुरस माहिती देतो. 

शर्मा आपल्या नेटवर्किंग मार्केटिंग साखळीचे सदस्य (मेंबर) होण्यासाठी लोकांना आवाहन करत स्वतः महिन्याला ६ लाख रुपये जीएसटी भरत असल्याचा दावाही करतो.

त्याच्या या दाव्यांनंतर त्याच्याशी माध्यमांनी संपर्क साधल्यावर शर्मा म्हणतो, ‘१०० कोटींची कमाई ही माझ्या सर्व कंपन्यांच्या एकत्रित उलाढालीची आहे. लक्झरी गाड्या आणि संपत्ती या कंपनीच्या मालकीच्या आहेत, माझ्या वैयक्तिक नाहीत.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकारांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नेटवर्किंग मार्केटिंगमध्ये सुरुवातीचे काही सदस्यच फायदा मिळवतात, परंतु नंतर सहभागी होणारे बहुतेक जण नुकसान सोसतात, असा अनुभव अनेकांनी शेअर केला आहे. त्यामुळे रवी शर्माच्या ‘जादूई कमाईच्या’ दाव्यांपासून जरा जपूनच वागा, असा सल्ला नागरिकांकडून दिला जात आहे.


हेही वाचा